विशाखापट्टणम येथील प्राचीन सिंहाचलम मंदिर


विशाखापट्टणम येथून जवळ असलेल्या पहाडावर असलेले भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारातील सिंहाचलम मंदिर ११ व्या शतकातील जगातील निवडक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हा पर्वत हे नरसिंहाचे निवासस्थान मानले जाते. सिंहाचल याचा अर्थ सिंहाचा पर्वत असा आहे. प्रल्हाद रक्षणासाठी नरसिंहाने येथे अवतार घेतला होता असा समज आहे.


स्थळ पुरातातील उल्लेखाप्रमाणे भक्त प्रल्हाद याने हिरण्यकश्यपूचा वध नरसिंहाने केल्यानंतर हे मंदिर बांधले पण कृत युगात ते नष्ट झाले. त्यानंतर लुणार वंशातील पुरुरवा याने ते पुन्हा बांधले. असे सांगतात कि पुरुरवा ऋषी आकाशमार्गे त्यांची पत्नी उर्वशी हिच्यासह जात असताना अचानक यांना या ठिकाणी उतरावे लागले तेव्हा जमिनीत पुरलेली नरसिंहाची मूर्ती त्यांना दिसली. त्याचबरोबर त्यांना असा दृष्टांत झाला कि या मूर्तीला चंदनाचा लेप लावून ती ठेवा आणि वर्षातून एकदा अक्षततृतीयेला १२ तासांसाठी हा लेप काढून मूळ मूर्ती दर्शन भक्तांना होऊ द्या. त्यानंतर पुन्हा चंदन लेप लावा.

आजही या प्रमाणेच सर्व विधी येथे केले जातात. मंदिरात पोहोचण्यासाठी साधारण ८०० पायरया चढाव्या लागतात. संपूर्ण मार्गावर अननस आणि आंब्याची झाडे असून वाटेत विसाव्यासाठी जागा आहेत. एप्रिल मध्ये येथे वार्षिकोत्सव होतो. चैत्रशुद्ध एकादशीला चंदनोत्सव होतो. मुला मूर्ती वराहलक्ष्मी नरसिंहाची आहे. मंदिरात ९६ काळ्या दगडातील कोरीव कामाने जडलेले खांब असून त्यांच्या १६ रांगा आहेत. मोठा नाट्य मंडप आहे तेथे दरवर्षी देवाचा विवाह सोहळा पार पडतो.

Leave a Comment