डच कंपनीची उडती कार लिबर्टी लाँच


जगातील पहिली फ्लाइंग कार लिबर्टी या नावाने पाल व्ही या डच कंपनीने जिनेव्हा मोटार शो मध्ये लाँच केली आहे. कमर्शिअली उपलब्ध असलेली ही पहिलीच उडती कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कार ची किंमत ४ कोटी रुपये असून ती पुढच्या वर्षीपासून मिळू शकेल.

लिबर्टी लेडमुक्त पेट्रोलवर चालते. हवेत तिचा वेग ताशी १८० तर जमिनीवर १७० किमी आहे. एकदा टाकी फुल केली की ती ५०० किमीचे अंतर कापते. जमिनीवरील कारचे उडणाऱ्या कारमध्ये रुपांतर होण्यासाठी १० मिनिटे लागतात. तीन चाकांची, दोन सीटर लिबर्टी हवेत उडताना प्रोपेलर आणि २ इंजिनच्या मदतीने उड्डाण करते. तिच्या टपावर असलेल्या रोटरमुळे ती हवेत स्थिर राहते.

जमिनीवर उतरताच प्रोपेलर व रोटर फोल्ड होतात व नेहमीच्या कार प्रमाणे ती रस्त्यावर धावते. ही कार चालाविण्यासाठी पायलट परवाना आवश्यक आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण कंपनी देते. अर्थात ही कार हवेत हेलिकॉप्टर प्रमाणे थेट वर उडत नाही तर त्यासाठी छोटा रनवे लागतो. उतरण्यासाठी हि जमिनीचा छोटा सलग पट्टा, गवताचा पट्टा आवश्यक असतो.

Leave a Comment