जपानचे दरवाजे २ लाख भारतीयांसाठी खुले


जपानने आयटी क्षेत्रातील २ लाख भारतीयांसाठी त्याचे दरवाजे खुले केले असून या लोकांना ग्रीन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. जपान ट्रेड ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष शिरोकी मेडा यांनी गुरुवारी हि घोषणा इंडिया जपान व्यापार भागीदारी परिषदेत बोलताना केली. ते म्हणाले सध्या जपानमध्ये ९.२०,००० आयटी प्रोफेशनल्स आहेत आणि भारतातून आणखी २ लाख प्रोफेशनल्सची गरज आहे. २०३० सालापर्यंत ही संख्या ८ लाखांवर जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

जपानच्या सामाजिक गरजांमध्ये तंत्रज्ञान आणि नवीन शोध यांचा वापर वेगाने वाढत असल्याने ही गरज निर्माण झाली असल्याचे शिरोकी यांनी सांगितले. कुशल प्रोफेशनल्स साठी जपान त्यांच्या पद्धतीचे ग्रीन कार्ड देणार असून यामुळे १ वर्षात जपानचा रहिवासी परवाना मिळू शकणार आहे. १ जानेवारी पासून जपानने भारतीय प्रवासी विसा नियम सुलभ आणि सोपे केले आहेत.

Leave a Comment