चीनमधील धनाढ्य भिकारी, कमाई मोजण्यास खास स्टाफ !


एखादा भिकारी भीक मागून इतके पैसे कमावतो, की ते मोजण्यासाठी त्याला खास स्टाफ नियुक्त करावा लागतो, असे तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल, अविश्वास देखील वाटेल. पण ही घटना सर्वस्वी सत्य आहे. चीनमध्ये राहणाऱ्या एका भिकाऱ्याची कमाई इतकी जास्त आहे, की त्याला एकट्याला एवढे पैसे मोजता येणे शक्य नसल्याने, हे सर्व पैसे मोजून त्याचा हिशोब ठेवण्यासाठी त्याने खास स्टाफची नियुक्ती केली आहे. यामुळे हा भिकारी प्रसिद्धीच्या झोतामध्ये आला आहे. आपली महिन्याभराची कमाई मोजण्यासाठी जो स्टाफ या भिकाऱ्याने ठेवला आहे, त्यांना काम झाल्यानंतर हा भिकारी भरघोस टिप देखील देत असल्याने जा भिकारी चांगलाच चर्चेत आहे.

हा भिकारी एका महिन्यामध्ये साधारणपणे एक लाख रुपये, भीक मागून कमावतो. असे म्हणतात, की हा भिकारी भीक मागण्यासाठी जिथे बसतो तिथे त्याला पैसे देण्यासाठी लोकांची रिघ लागते. पाहता पाहता नोटांचे ढीग या भिकाऱ्याकडे जमा होऊ लागतात. लोक या भिकाऱ्यावर इतके मेहेरबान कसे, याचे नेमके कारण कोणीच सांगू शकलेले नाही. भीक मागितलेल्या पैशांमधून या भिकाऱ्याने इतकी संपत्ती गोळा केली, की आता बीजिंग शहरामध्ये त्याच्या मालकीचे दोन मजली घर असून, त्याची तीनही मुले एका प्रतिष्ठित शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत.

या भिकाऱ्याच्या कुटुंबाचा सर्व खर्च त्याच्या एकट्याच्या कमाईवर सुरु आहे. एका रिपोर्टनुसार, भारतीय चलनाप्रमाणे सुमारे एक लाख रुपये इतकी भीक या भिकाऱ्याला एका महिन्यामध्ये मिळत असते. भीक मागितलेली रक्कम हा भिकारी पोस्ट ऑफिसमध्ये साठवतो. रक्कम जमा करण्यापूर्वी ती मोजण्यासाठी ह्या भिकाऱ्याने स्टाफ देखील ठेवला आहे. रक्कम मोजून त्याचा हीशोब झाला की हा भिकारी आपल्या स्टाफ ला त्यांच्या कामाच्या मोबदल्यामध्ये भरघोस टिप देखील देतो. पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा भिकारी १०० चीनी युआन, म्हणजेच सुमारे नऊशे रुपये टिप दाखल देतो.

Leave a Comment