भारतातील या ठिकाणी जाण्यास भारतीयांनाच बंदी


भारतातील काही ठिकाणी जाण्यास भारतीयांनाच बंदी केली गेली आहे, हे वाचून तुम्ही बुचकळ्यात पडलात ना? या ठिकाणांवर काही सरकारी गुप्त प्रोजेक्ट्स, किंवा संरक्षणखात्याशी निगडीत काही तरी गुप्त ठिकाणे येथे असल्याने ही बंदी केली गेली आहे असे तुम्हाला वाटत असले, तर हा ही समज चुकीचा आहे. आपल्या भारत देशामध्ये काही ठिकाणे अशी आहेत, जिथे भारतीयांना जाण्यास मनाई असली, तरी परदेशी नागरिकांचे मात्र येथे मनापासून स्वागत केले जाते. भारतामध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे, तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. पण काही ठिकाणे अशी आहेत, जी भारतीय भूमीवर असूनही येथे जाण्याची परवानगी भारतीयांना नाही.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की परिवारासोबत किंवा मित्रमंडळींसोबत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचे कार्यक्रम ठरत असतात. हिमाचल प्रदेशमधील कसोल हे ठिकाण पर्यटकांच्या विशेष पसंतीचे समजले जाते. पण या ठिकाणी एक रेस्टॉरंट असे आहे, जिथे भारतीय नागरिकांना प्रवेश नाही. एका भारतीय महिला पर्यटकाला जेव्हा या रेस्टॉरंटमध्ये येण्यास मनाई केली गेली, तेव्हा हे रेस्टॉरंट पहिल्यांद चर्चेत आले. ‘ फ्री कसोल कॅफे ‘ असे या रेस्टॉरंटचे नाव असून, इथे येण्याला मनाई केल्यानंतर संबंधित महिलेचे सोशल मिडियावरील पोस्ट व्हायरल झाले होते. कसोल या गावाला ‘मिनी इजराईल’ देखील म्हटले जाते, कारण या भागामध्ये इजराईली लोकांची जनसंख्या जास्त आहे. त्याचमुळे येथील रेस्टॉरंटमध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी आहे.

बंगळूरू येथील ‘उनो ईन हॉटेल’ हे हॉटेल देखील स्थानिक प्रशासनाने रंगभेदाचा आरोप करीत बंद करविले होते. भारतीय नागरिकांना या हॉटेल मध्ये येण्यास मनाई केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. त्याचप्रमाणे चेन्नई येथील ‘अंजान हॉटेल’ मध्ये देखील केवळ विदेशी पासपोर्ट धारकांना प्रवेश आहे. या हॉटेलचे कोणतेही ठराविक नाव नसल्याने याला ‘अंजान हॉटेल’ म्हटले जाते. काही लोक या हॉटेलला ‘हायलंड हॉटेल’ या नावाने ओळखतात, तर काही जण याला ‘ब्रोडलंड हॉटेल’ या नावाने संबोधतात.

गोव्यातील अनेक बीचेस वर भारतीय नागरिकांना जाण्यास मनाई आहे. हे बीच ‘ फॉरिनर्स ओन्ली ‘ म्हणून ओळखले जातात. पुदुच्चेरी मध्ये देखील असाच बीच आहे. या ठिकाणी फ्रेंच रहिवाश्यांची संख्या जास्त असून या बीचवर जाण्यास भारतीयांना मनाई आहे.

Leave a Comment