जागतिक महिला दिनानिमित्त गुगलचे अनोखे डुडल


मुंबई : गुगलने जागतिक महिला दिनानिमित्त अनोख डुडल बनवले असून गुगलचे हे डूडल महिला दिनाच्या आदल्यादिवसापासूनच दिसू लागले होते. जागतिक महिला दिन १९१० पासून ८ मार्चला केला जातो.

गुगलच्या या डुडलमध्ये खूप साऱ्या डिझाइन्स आणि प्रत्येकाची वेगळी कहाणी दाखवण्यात आली आहे. गुगलने यासाठी १२ महिला कलाकारांशी चर्चा केली. गुगलने या डूडलच्या माध्यमातून जगभरातील वेगवेगळ्या भागातील महिला कलाकारांच्या कहाण्या सांगितल्या आहेत. ‘इंटरनॅशनल गुगल डे २०१८’च्या या सर्व कहाण्या हिस्सा आहेत. प्रत्येक कहाणीतून वेळ, व्यक्तिमत्व आणि घटना सांगितली जात आहे. #herstoryourstory हे ट्रेंडिंग होत असून यामध्ये १२ कहाण्या वाचता येणार आहेत.

Leave a Comment