नोटबंदीमुळे मालामाल झाले पेटीएम चे विजय शर्मा


नोव्हेंबर २०१६ रोजी देशात अचानक नोटबंदी जाहीर झाली आणि त्यामुळे कुणाकुणाचे किती नुकसान झाले याच्या बातम्या आपण वाचल्या होत्या. या नोटबंदीचा फायदा अनेकांना मिळाला आहे आणि त्यातील एक प्रमुख नाव आहे पेटीएम या मोबाईल वॉलेटचे संस्थापक विजय शेखर गुप्ता याचे. फोर्ब्जने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंत यादीत ३९ वर्षाचे विजय सामील झाले असून ४० वर्षे पूर्ण होण्याआधी अब्जाधीश बनलेले ते देशातले पहिले व्यावसायिक ठरले आहेत.

शर्मा यांनी पेटीएम वॉलेट पाठोपाठ पेटीएम मॉल आणि पेटीएम पेमेंट बँक सुरु केली होती. त्यांना त्यांच्या या उद्योगात सर्वाधिक फायदा नोटबंदीमुळे झाला कारण नोटबंदी नंतर निर्माण झालेल्या नोट टंचाईमुळे त्यांच्या ग्राहकांची संख्या प्रचंड वाढली व आज त्यांचे २५ कोटीं नोंदणीकृत युजर आहेत. दररोज सरासरी ७० लाख युजर या सेवेचा वापर करतात. या व्यवसायात शर्मा यांचा हिस्सा १६ टक्के असून त्याचे मूल्य ९.४ अब्ज डॉलर्स आहे. शर्मा याची संपत्ती १.७ अब्ज डॉलर्स असून ते फोर्ब्स यादीत १३९४ व्या क्रमांकावर आहेत.

Leave a Comment