हुवेईचा मेट एसई स्मार्टफोन लाँच


फुल स्क्रीन डिझाईनचा मेट एसई स्मार्टफोन हुवेई ने युएसए मध्ये लाँच केला असून २२९.९९ डॉलर्स म्हणजे १५ हजार रुपयात तो अमेझॉन, बेस्ट बाय आणि बी अँड एच वर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. ग्रे आणि गोल्ड अश्या दोन रंगात हा फोन मिळेल.

या फोनसाठी ५.९३ इंची फुल एचडी डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी, ती मायक्रोकार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. अँड्राईड नगेत ७.०, ३३४० एमएएचची फास्ट चार्जिंग सुविधा असलेली बॅटरी, २१ तासाचा टॉकटाईम, फोटोसाठी १६ एमपी व २ एमपीचा डूअल रिअर कॅमेरा सेट, व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे. हा फोन हायब्रीड डूअल सीम सपोर्ट करतो.

Leave a Comment