भारतातली सर्वात महाग, रोल्स रॉईस फँटम एट लाँच


रोल्स रॉईसने त्यांची नवी लक्झरी कार फँटम एट भारतात लाँच केली असून ही देशातली सर्वात महाग कार ठरली आहे. आठव्या जनरेश मॉडेलच्या या कारची बेसिक किंमत ९. कोटी असून एक्सटेंडेट व्हीलबेस व्हर्जनची एक्स शोरूम किंमत ११.५ कोटी रुपये आहे. हे व्हर्जन जगातील सर्वात लक्झुरीअस प्रोडक्शन मानले जाते. कारच्या किंमतीत चार वर्षासाठी सर्व्हिसिंग, रिजनल वॉरंटी, २४ तास रोडसाईड सपोर्ट सामील असून ही कार कस्टमाईज करता येणार आहे.

या नव्या मॉडेलला अल्युमिनीयम स्पेसफ्रेम प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे. त्यामुळे ती पहिल्या मॉडेलपेक्षा वजनाला हलकी झाली आहे. याच प्लॅटफॉर्मवर कंपनी त्याची पहिली एसयुव्ही कलिनन तयार करणार आहे. फँटम एट ला ६.७५ लिटरचे व्ही १२ पेट्रोल इंजिन ८ स्पीड ऑटो गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ५.३ सेकंदात गाठते. कारमध्ये पुरेशी स्पेस आहे तसेच स्टारलाईट रुफ दिले गेले असून त्यामुळे रात्रीचे आकाश पाहणे शक्य आहे. दरवाजे बटणाच्या सहायाने उघड बंद करता येतात.

बिझिनेस क्लास कस्टमरला डोळ्यापुढे ठेऊन हि कार बनविली गेली असून कंपनीने १६ वर्षानंतर न्यू जनरेशन मॉडेल सादर केले आहे. ही कार चेन्नईमध्ये लाँच करण्यात आली.