बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करताय? सावधान!


बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी सावधगिरीचा इशारा एका नामवंत अर्थतज्ज्ञाने दिला आहे. भविष्यात या क्रिप्टोकरन्सीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे, असा इशारा या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ आणि हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेले केनेथ रोगॉफ यांनी हा इशारा दिला आहे. येत्या दहा वर्षांची किंमत 100 डॉलर एवढी कमी होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बिटकॉईनच्या किमतीने छप्परफाड पातळी गाठली होती. त्यावेळी एका बिटकॉईनची किंमत 1735 डॉलर एवढी होती. त्यामुळे या चलनात गुंतवणूक करणारे अनेक जण लक्षाधीश व कोट्याधीश झाल. मात्र त्यानंतर या चलनाची किंमत सातत्याने कमी होत आहे.

हवाला व्यापार आणि कर चुकवेगिरी यांची शक्यता वजा केली तर बिटकॉईन चलन म्हणून अत्यंत निरुपयोगी आहे. यामुळे येत्या 10 वर्षांत या चलनाची किंमत तिच्या सध्याच्या किमतीपेक्षा अत्यंत कमी असेल असे रोगॉफ यांनी म्हटले आहे.

बिटकॉईनवर नियंत्रण आणायचे असेल तर ते सर्व देशांनी मिळून एकत्रितपणे आणले पाहिजे. एखाद-दुसऱ्या देशाने नियंत्रण आणने निरुपयोगी आहे, असे ते म्हणाले. भारतातही बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून मान्यता देण्यात येणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment