भारतीय सेनादलात नोकरी करण्याची १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी


मुंबई : भारतीय सेना दलात नोकरी करण्याची संधी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मिळणार आहे. यासाठी सगळ्या वर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात. ही सर्व प्रक्रिया निःशुल्क असणार आहे. उमेदवारांची नेमणूक ही लेखी परिक्षा आणि शारीरिक चाचणीद्वारे केली जाणार आहे

लोअर डिव्हिजन क्लर्क व फायरमॅन या पदाच्या एकूण १५ जागांसाठी भरती होणार असून यासाठी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतील. या भरतीसाठी १८ ते २५ वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१८ आहे. www.indianarmy.nic.in संकेतस्थळावर क्लिक करून भरतीसाठीचा फॉर्म उपलब्ध होईल. तो डाऊनलोड करून पहिल्यांदा पूर्णपणे वाचा. त्यानंतर योग्य ती माहिती त्यामध्ये भरा. त्यानंतर तो फॉर्म योग्य पद्धतीने वाचल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ डिफेंस, १६ फील्ड एम्युनिशन डिपो, सी/ओ 99 एपीओ या पत्त्यावर पाठवा. या भरतीकरता निशुःल्क सेवा दिली जाणार आहे.