राजांच्या सिंहगडावर रोपवे होणार


छत्रपती शिवाजी राजे यांच्या राजधानी रायगड येथे रोपवे चा प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्यानंतर आता पुण्याजवळच्या सिंहगडावर रोपवे सुविधा दिली जाणार आहे. पुण्यापासून जवळ असलेल्या या गडावर बारमाही पर्यटक, गिर्यारोहक याची गर्दी असते. पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच या रोपवे मुळे गडावर होणारी वाहन गर्दी कमी होइल तसेच स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी पासून गडावरील टीव्ही टॉवर असा रोपवे असून हे अंतर ५ ते ७ मिनिटात कापले जाणार आहे.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र मध्ये या रोपवेची संकल्पना मांडली गेली होती. खासगी गुंतवणुकीतून हे काम केले जाणार असून त्यासाठी ११६ कोटी रु. खर्च अपेक्षित आहे. अर्थात रोपवे साठी ४१ कोटी रुपये लागणार असून या रोपवे साठी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. गडाची जागा सध्या वनविभागाकडे आहे. हे प्रस्ताव पीएमआरडीए कडे सादर केला गेला असून त्याला लवकरच मान्यता दिली जाईल असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.

Leave a Comment