चीनमध्ये बनतेय ताशी ६ हजार किमी वेगाने जाणारे विमान


बीजिंग ते दिल्ली या एरव्ही आठ तासाचा विमान प्रवास अर्ध्या तासात करायची कल्पना कशी वाटते? चीनने यासाठी हायपरसोनिक विमान डिझाईन केले असून या प्रकारचे प्रवासी विमान बनविण्यात आघाडी घेतली आहे. हायपरसॉनिक विमानाचा शोध नवीन नाही मात्र अश्या प्रकारची विमाने प्रामुख्याने लष्करी प्रयोगासाठी संशोधित केली जातात. त्यासाठी येणारा खर्च मोठा असतो. चीन प्रथमच या प्रकारचे प्रवासी विमान बनवीत आहे. या विमानाचा वेग ताशी ६ हजार किमी असेल. ध्वनीच्या वेगपेक्षा पाचपटीने अधिक त्याचा वेग असेल.

या विमानावर चीनची अॅकॅडमी ऑफ सायन्सेसची टीम काम करते आहे. त्याच्या समोर दोन मुख्य आव्हाने आहेत. एरोडायनामिक्स आणि इंजिन गती. या वेगाने जाणारया विमानाला हवेचा विरोध अधिक प्रमाणात झेलावा लागतो. त्याचबरोबर त्याचा प्रचंड आवाज, निर्माण होणारी उष्णता आणि शॉक वेव्हज याचाही विचार करावा लागतो. या विमानामुळे निर्माण होणाऱ्या शॉक वेव्हजमुळे व आवाजामुळे काचा फुटू शकतात. चीनने विंड टनेल मध्ये छोट्या प्रमाणावर या चाचण्या घेतल्या आहेत. हे विमान पॅसीफिक समुद्राला दोन तासात पूर्ण प्रदक्षिणा घालू शकणार आहे. हि विमाने वापरत येण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल असे सांगितले जात आहे.

या पूर्वी सर्वात वेगवान म्हणून काँकार्ड विमाने १९६९ साली वापरात आली होती आणि भविष्यातील विमाने म्हणून त्यांचे कौतुक झाले होते. मात्र हा प्रवास महाग होता आणि आवाज प्रदूषणामुळे हि विमाने २००३ पासून सेवेतून काढून टाकण्यात आली होती.

Leave a Comment