रिलायंस जिओ कार्यालात मुकेश अंबानींना केबिन नाही


रिलायंस जिओच्या मुख्यालयाचे काही फोटो नुकतेच प्रसिद्ध झाले असून या अत्याधुनिक कार्यालयात मुकेश अंबानी यांच्या साठी स्वतंत्र केबिन नाही. मुकेश कंपनीतील अन्य सहकाऱ्यांसोबत बसून काम करत आहेत. या कार्यालयात ओपन ऑफिस कल्चर आहे हे त्यामागचे कारण आहे. मुंबई ठाणे बेलापूर रोडवर असलेले हे कार्यालय ८ मजली असून हायटेक आहे. या इमारतीला हर्मन मिलर रिच अॅवॉर्ड मिळाले आहे.

या कार्यालयात टाकावू मालापासून अनेक वस्तू बनविल्या आहेत. या कार्यालयाच्या बांधकामासाठी २१ अब्ज रुपये खर्च आला असून रिलायन्सचे हे सर्वात मोठे कार्यालय असल्याचे सांगितले जात आहे. या कँपस मध्ये लॉन, गेस्ट हाउस, हॉटेल आहेच पण अन्य अत्याधुनिक सुविधाही पुरविल्या गेल्या आहेत.

Leave a Comment