आकाश अंबानी श्लोका बरोबर घेणार सात फेरे


रिलायंस उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आकाश अंबानी याचा साखरपुडा २४ मार्च रोजी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आकाश हिरे व्यापारी रसेल मेहता याची कनिष्ठ कन्या श्लोका हिच्यासोबत सात फेरे घेणार असून हा विवाह डिसेंबरच्या सुरवातीला होईल असे समजते. या विवाहाबाबत दोन्ही बाजूंकडून मौन बाळगले गेले असून त्यासंदर्भातील ईमेल अनुत्तरीत ठेवली गेली आहेत.

श्लोका रोझी ब्ल्यू डायमंड कंपनीचे प्रमुख रसेल याची कन्या आहे. ती व आकाश धीरूभाई अंबानी शाळेत एकत्र शिकलेले आहेत. ही दोन्ही कुटुंबे एकमेकांशी चांगली परिचित आहेत. आकाश रिलायंस बरोबरच जिओच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत तर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलीटिक्स मधून मास्टर्स पदवी घेतली आहे. ती सध्या रोझी डायमंडची संचालक म्हणून काम करते आहे.

Leave a Comment