गेल्या दोन वर्षात अफगानिस्तात पाकिस्तानी बाजाराची पीछेहाट होत असल्याचे व भारतीय वस्तूंचा बाजार वाढत चालला असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षात पाकिस्तानी बाजार निम्म्यावर घसरला आहे. गेल्या वर्षात हा बाजार २.७ अब्ज डॉलर्सवरून १.२ अब्ज डॉलर्सवर आला आहे. भारताची अफगानिस्तानची वाढती जवळीक आणि पाकिस्तानच्या तुलनेत स्वस्त मिळत असलेला चांगला भारतीय माल याचा थेट परिणाम काबुल बाजारावर दिसत असल्यचे चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे प्रमुख जुबैर मोतीवाला यांनी सांगितले.
अफगाणी लोकांची पाक पेक्षा भारतीय वस्तूंना पसंती
भारतीय बाजाराने गेल्या दोन वर्षात अफगानिस्तानात चांगला जम बसविल्याचे सांगून ते म्हणाले, गहू पीठ, कपडे, रेड मीट या सारख्या मुलभूत गरजेच्या वस्तू भारत कमी दरात पुरवत आहे शिवाय विमान दरात ७५ टक्के सवलत दिल्याने भारतातून आयात अधिक प्रमाणात होत आहे. पाकच्या पेशावर मध्ये मेडिकल टुरिझम मुखत्वे अफगाणी लोकांमुळे भरभराटीत होते मात्र आता यासाठीही अफगाणी भारत जाणे अधिक पसंत करत आहेत. परिणामी पेशावर मधील हा व्यवसाय पूर्ण कोलमडला आहे.