विमानाच्या खिडक्या गोल आकाराच्याच का असतात ?


अत्यंत आरामदायक अशी विमानाची सैर असते, असे आपण मानतो. त्याचबरोबर कमी वेळात दुरवरचा प्रवासही पूर्ण होतो. आपणही अनेकदा विमान प्रवास केला असेल. पण विमानाच्या खिडक्या गोलाकारच का असतात. त्यामागे काय कारण असेल? असा विचार आपण कधी केला आहे का? अशा खिडक्या आधीपासूनच डिझाईन करण्यात आल्या असतील. विमान लांबी आणि रुंदी गोल असल्यानेच अशा खिडक्या लावण्यात आल्या असतील. अशी उत्तरे आपण नक्कीच द्याल. तुमची उत्तरे पूर्णपणे चुकीची आहेत.

आज आम्ही तुम्हाला विमानाच्या गोलाकार खिडक्यांमागील रहस्य सांगणार आहोत. विमानाच्या सार्वजनिक वापराला साधारणपणे १९५० पासून सुरूवात झाली. त्याकाळी विमानाच्या खिडक्यांचा आकार चौकोनी होता. १९५३मध्ये २ विमान अपघात झाले. या अपघातात ५६ लोकांनी प्राण गमावले होते. त्यावेळी त्या चौकोनी खिडक्यांनाच या विमान दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले होते. त्यामुळेच अपघात झाला असावा असे सांगण्यात आले होते.

विमानाला असलेल्या चौकोनी खिडक्यांना चार कोपरे होते. त्यावर प्रेशर आले तर खिडक्या फुटू शकतात असा तर्क तेव्हा मांडण्यात आला. त्यामुळे आता या खिडक्या गोलाकार ठेवल्या जातात, त्यामुळे प्रेशर सर्वत्र रारखे पडते आणि यामुळे खिडकीला इजा होण्याची शक्यता कमी होते.

Leave a Comment