आपल्या आरोग्यासाठी पपईचे फायदे


पपई हे फळ अतिशय चविष्ट आहेच, आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील याचे सेवन अतिशय फायदेशीर आहे. पपईमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, पोटॅशियम, फायबर, इत्यादी पोषक तत्वे असतात. त्यामुळे ह्या फळाच्या सेवनाने अनेक तऱ्हेचे विकार लांब ठेवता येऊ शकतात. पपईच्या सेवनाने शरीराला त्वरित उर्जा मिळते. त्याचबरोबर या मध्ये कॅलरीज नसल्यामुळे, वजन घटविण्यासाठी हे फळ उत्तम पर्याय आहे. पपई आवडत असल्यास फोडी करून खावी, किंवा त्याचा रस प्यावा, किंवा आवडत असल्यास इतर फळांच्या रसांमध्ये मिसळून प्यावा.

ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास असेल, त्यांच्यासाठी पपईचे सेवन अतिशय फायदेशीर आहे. पपईमध्ये असलेले काही विशिष्ट एन्ज़ाइम्स पोटामधील गॅसेस दूर करण्यास मदत करून पोट साफ होण्यास सहायक आहेत. त्यामुळे बद्ध्कोद्ष्ठ देखील दूर होते. त्याचबरोबर शरीरामधील वाढलेले कोलेस्टेरोल घटविण्यासाठी देखील पपईचे सेवन गुणकारी आहे. पपईमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर आहे, तसेच यामध्ये अ आणि क जीवनसत्वे देखील आहेत. पपईमध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या मात्रेमध्ये असल्याने कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत होते.

काविळीच्या रुग्णांना पपईच्या सेवानाने फायदा होतो. तसेच वजन घटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी देखील पपईच्या सेवनाने फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी दररोज मध्यम आकाराची एक पपई खावी. पपईमध्ये फायबर मोठ्या मात्रेमध्ये असल्याने त्याच्या सेवनाने पोट अधिक काळाकरिता भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजन घटू लागते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टीदोष असणाऱ्यांसाठी पपईचे सेवन फायदेशीर आहे. यामध्ये अ जीवनसत्व असल्याने याच्या सेवनाने दृष्टीदोष सुधारण्यास मदत होते.

पपईचे नियमित सेवन त्वचेच्या सौन्दर्याकरिता अतिशय फायदेशीर आहे. तसेच पिकलेल्या पपईच्या गरामध्ये थोडेसे मध घालून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळण्यास मदत होते, त्वचेवर उन्हामुळे आलेला काळसरपणा दूर होतो आणि त्वचेवरील काळे डाग हटण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही