मुकेश अंबानी एका मिनिटाला कमवतात एवढे पैसे


तुम्ही अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी दर मिनिटाला किती पैसे कमावतात याचा अंदाज लावू शकता का? जगातील श्रीमंतांची एक यादी नुकतीच हुरुन ग्‍लोबलने जाहीर केली. मुकेश अंबानी या यादीत ४५ बि‍लि‍यन डॉलर (सुमारे २.९२ लाख कोटी रुपयांसह) सर्वात श्रीमंत भारतीय ठरले. तसेच त्यांचा जगातील २० श्रीमंतांमध्ये समावेश झाला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दर मिनिटाला मुकेश अंबानी २.३५ लाख रुपये कमावतात. ही रक्कम भारतीय व्यक्तीच्या सरासरी वार्षिक कमाईपेक्षा खूप जास्त आहे.

एका आकडेवारीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजची २०१५-१६ मध्ये कमाई २७६३० कोटी झाली होती. मुकेश अंबानींची कंपनीत प्रमोटर म्हणून ४४.७% भागीदारी आहे. त्यांच्या वाट्याला त्यानुसार १२३५१ कोटी रुपये येतात. त्यामुळे दर महिन्याची कमाई काढली तर ती १०२९ कोटी होते. म्हणजे २५७ कोटी आठवड्याची आणि ३४ कोटी दिवसाची कमाई होते. याची आकडेवारी काढली तर १.४ कोटी एका तासाची कमाई आणि २.३५ लाख रूपये मिनिटाची कमाई होते. ही माहिती २०१५-१६ च्या आर्थिक आकडेवारीवरून मिळवली असून आम्ही अंबानी एवढीच कमाई करत असतील असा दावा करत नाही.

Leave a Comment