पर्यटकांचे स्पेस हॉलीडे स्वप्न याच वर्षात होणार साकार


अंतराळात आपणही फिरून यावे अशी इच्छा अनेकांना असेल पण त्यासाठी करावा लागणारा खर्च लक्षात घेतला तर अंतराळात न जाताही डोळ्यासमोर तारे चमकतात. असे असले तरी हे स्पेस हॉलिडेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे. पर्यटकांना या रोमाचाकारी प्रवासास नेणारी रॉकेट कॅपसुल तिच्या चाचण्यात यशस्वी झाली आहे. ब्लु ऑरीझोन च्या वेस्ट टेक्सस लाँच साईटवरून या क्रू कॅपसुल २.० ची तीन महीन्यापूर्वी चाचणी घेतली गेली आहे. पुन्हा वापर करता येणाऱ्या रॉकेट लाँचर न्यू शेफर्डच्या मदतीने ही चाचणी यशस्वी झाली.


या कॅप्सूल मधून पर्यटक पृथ्वीच्या १०० किमी वर जाऊ शकणार आहेत. हे रॉकेट पुन्हा वापरता येणार असल्याने त्यासाठी येणारा खर्च कमी होणार आहे. स्पेस कॅप्सूलचे हे ७ वे उड्डाण होते असे समजते. या प्रवासाचा खर्च तुलनेने कमी होणार असल्याने अधिकाधिक पर्यटक स्पेस हॉलिडेचा आनंद लुटू शकणार आहेत. ही ब्लू कॅप्सूल मार्चमध्ये प्रथम सार्वजनिक स्वरुपात दाखविली गेली.

ब्लू आरिझोन आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या म्हणण्यानुसार २.४ फुट रुंद व साडेतीन फुट उंचीच्या खिडक्या असलेली अंतराळ यात्रा करणारी ही पहिलीच कॅप्सूल आहे. यात सहा सीट आहेत व प्रत्येक सीटसाठी वेगळा स्क्रीन आहे. त्यावर पर्यटकांना फ्लाईट संबंधी माहिती मिळू शकेल. आणीबाणी ओढवली तर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक मोटारही यात आहे.

Leave a Comment