गुगल सेल्फ ड्रायव्हिंग कारचा ८० लाख किमी प्रवास


गुगलने विमो या त्याच्या सेल्फ ड्रायव्हिंग कार कंपनीने हाती घेतलेल्या २००९ सालच्या प्रकल्पात चांगलीच प्रगती केली असून नुकताच सेल्फ ड्रायव्हिंग कारच ३६० डिग्री व्हिडीओ सादर केला आहे. या व्हिडीओ मध्ये हे तंत्रज्ञान दाखवून त्याची माहिती ब्लॉग मध्ये दिली आहे.

या माहितीनुसार गुगलच्या सेल्फ ड्रायव्हिंग कारने सार्वजनिक रस्त्यांवर ८० लाख किमी प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला असून अश्या कारचा ताफा असलेली विमो जगातील पहिली कंपनी बनली आहे. यामुळे पूर्ण सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञानावर सार्वजिनक रास्थांवरून धावण्यात या गाड्या सक्षम असल्याचे सिद्ध होत अल्स्ल्याचा दावा केला जात आहे. या गाड्यात असलेले कॅमेरे, सेन्सर आसपासची वाहने तसेच ट्रॅफिक सिग्नल ओळखून प्रवास करतात.

Leave a Comment