अंतराळवीरांसाठी नासाने बनविला हॅपी सूट


अंतराळात दीर्घ काळ राहावे लागणाऱ्या अंतराळवीरांना नैराश्य येते ते दूर करणारा खास प्रकारचा अंतराळ सूट नासाने बनविला असून त्याचे नामकरण हॅपी सूट असे केले गेले आहे. वेगवेगळ्या मिशनवर जाणाऱ्या अंतराळवीरांना तेथे येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी हा सूट मानसिकरीत्या तयार ठेवेल असे समजते.

या सूटवर विशिष्ठ प्रकारचे बॉडी सेन्सर लावले गेले असून ते अंतराळवीराच्या मूड वर लक्ष ठेवतात. तसेच आसपासचे वातावरण, गुरुत्वाकर्षण, प्रकाश तीव्रता मोजून कुठल्या वातावरणात अंतराळवीराचा मूड खराब होतो हे ओळखतात व त्याप्रमाणे अंतराळवीराच्या मेंदूकडे असे सिग्नल पाठवितात जेणे करून तणावातून बाहेर येण्यास मदत मिळते. अंतराळवीरांना दीर्घकाळ कुटुंब, मित्रांपासून तसेच पृथ्वीपासून दूर राहावे लागते. त्यामुळे एकटेपणा येतो. गुरुत्वाकर्षण नसलेल्या स्थितीत राहून मेंदूवर वाईट परिणाम होतो व त्यामुळे अनेकदा मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. या सूटमुळे हे धोके काही प्रमाणात टाळता येणे शक्य आहे असा दावा केला जात आहे.

Leave a Comment