बाळाचा पाळणा, किंमत ४० लाख रुपये


हौसेला मोल नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे. अतिश्रीमंत लोक कशासाठी किती पैसा खर्च करतील हे सांगणे अवघड आहे तरीही बाळाच्या पाळण्यासाठी कुणी ४० लाख रुपये खर्च करेल यावर विश्वास बसणे थोडे कठीणच. कारण बाळ या पाळण्याचा उपयोग किती काळ करू शकणार न? दुबईत लुलू कंपनी इंडेक्स इंटिरियर डिझाईन प्रदर्शनात एक महागडा पाळणा लाँच करत असून त्याची किंमत ६० हजार अमेरिकी डॉलर म्हणजे ४० लाख रुपये आहे. सोन्याचा वापर करून बनविलेल्या या पाळण्यावर उच्च दर्जाचे स्वरोस्की हिरे जडविले गेले आहेत.

जगातील हा सर्वात महागडा पाळणा ठरला आहे. या पाळण्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशात दुबईतील महागड्या बुर्ज खलिफा इमारतीत दोन बेडरूमचा फ्लॅट वर्षभर भाड्याने घेता येईल असे सांगितले जात आहे. मार्च २४ ते २९ या दरम्यान हे प्रदर्शन दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये भरत असून हा पाळणा याच या महागड्या बोटी बनविणाऱ्या बिल्डर्सनी बनविला आहे. बाळाला आईच्या गर्भात असल्याचा फील हा पाळणा देईल असा दावा केला जात असून या पाळण्याच्या खरेदीसाठी रांगा लागतील असा दावा केला जात आहे.