कमालीची कारागिरी- वय अवघे १९, प्रसिद्धी जागतिक


जगभरात जे लोक जिनिअस म्हणून ओळखले जातात या सर्वांनाच त्याची हुशारी जगापुढे सिद्ध होण्यासाठी झगडावे लागले आहे. अल्बर्ट आईनस्टाईन, स्टीव्हन स्पीलबर्ग, वॉल्ट डिस्ने यांना तर शाळेत अथवा संबंधित संस्थातून प्रवेश दिला गेला नव्हता. मुंबईतील १९ वर्षाचा युवक सुशांत सुशील राणे याच प्रकारात मोडतो. ड्रॉइंग विषयात कमालीचे टॅलंट असलेल्या सुशांतला कला विद्यालयाने तीन वेळा प्रवेश नाकारला होता पण आज सुशांत जगातील सर्वात लहान वयाचा थ्रीडी आर्टिस्ट म्हणून प्रसिद्धीस आला आहे.


मुळात रिअलिटी पेंटिंगची आवड असलेल्या सुशांतने २०१५ साली थ्रीडी पेंटिंगची सुरवात केली. त्याची या बाबतीत प्रतिभा इतकी तेज होती कि अवघ्या एक महिन्यात त्याने हा कलेत प्राविण्य मिळविले तेही इंटरनेट पाहून व पुस्तके वाचून. हायलाईट, टेक्सचर, कलर टोन याचा अद्भुत वापर करणारा शुशांत स्वतःची काही खास कौशल्ये विकसित करण्यात यशस्वी झाला आहे.


हा भयंकर साप रेखाटून त्याने स्वयंपाक घराच्या ओट्यावर ठेवला तेव्हा काही कल्पना नसताना आत आलेली आई भीतीने पांढरी फटक पडल्याची आठवण तो सांगतो.


टेबलावरचा बल्ब उचलायला गेलात तरी कागद हातात येणार आणि फजिती होणार.


हे गोड दिसणारे कुत्राचे पिलू खरे नाही हे सांगूनतरी खरे वाटेल?