पुढच्या वर्षी चंद्रावरही मिळेल 4जी नेटवर्क


पृथ्वीवर सर्वत्र 4जी नेटवर्क मिळत नसताना चंद्रावर हे नेटवर्क पुरविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2019 साली चंद्राच्या पृष्ठभागावरही 4जी नेटवर्क मिळेल, असे व्होडाफोन या टेलिकॉम कंपनीने जाहीर केले आहे. त्यासाठी कंपनीने नोकिया कंपनीशी हात मिळवणी केली आहे.

पुढच्या वर्षी चंद्राच्या पृष्ठभागावर मनुष्याने पाऊल ठेवण्याच्या ऐतिहासिक घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त ही कामगिरी करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर व्होडाफोन आणि नोकीया यांनी बर्लिन येथील पीटी सायंटिस्टस् या अंतराळ संशोधन कंपनीसोबत कामावर सुरुवात केली आहे. पीटी सायंटिस्ट्चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोबर्ट बोम यांनी ही माहिती दिली आहे.

केन कार्निव्हल येथील स्पेस एक्स फॅक्टर9 या रॉकेटमधून 2019 या वर्षी ही चांद्रमोहीम सुरू होईल. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवर हाय डेफिनेशन स्ट्रीमिंग शक्य होईल. यासाठी सुमारे एक किलो वजनाचा हार्डवेअर लागणार आहे, असे रोबर्ट बोम म्हणाले. तर दुसरीकडे 5जी सेवा पुरविण्याएवढी तयारी झालेली नाही, परंतु 5जी नेटवर्कचीही चाचणी सुरू केल्याचे व्होडाफोनने म्हटले आहे.

Leave a Comment