‘गुड मॉर्निंग’ सारख्या मेसेजपासून होणार सुटका


नवी दिल्ली : यूजर्सची स्पॅम मेसेजपासून सुटका करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने पूर्ण तयारी केली असून ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड इव्हिनिंग’च्या मेसेजेसने व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स वैतागलेले असतात. अशा मेसेजेसपासून यूजर्सची सुटका करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप एक नवे फीचर टेस्ट करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या हे फीचर यूजरला फॉरवर्ड मेसेजची माहिती देणार आहे. ही माहिती यूजर्स सहज घेऊ शकणार की, मेसेज कुणाकडून टाईप करण्यात आला आहे की, दुस-याच्या चॅटमधून कॉपी पेस्ट करून फॉरवर्ड केला जातो आहे. जे मेसेज फॉरवर्ड केले जातील त्यावर ‘Forwarded Message’ असे लिहिलेले असेल.

हे फीचर WABETaInfo यांनी स्पॉट केले असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन २.१८.६७ मध्ये हे फीचर मिळेल. हे फीचर यासोबतच विंडोजमध्येही दिसेल. हे फीचर आल्यानंतर तुमची रोज मिळणा-या ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड इव्हिनिंग’सारखे फॉरवॉर्डेड मेसेजेसपासून सुटका होईल.

विंडोजनंतर अ‍ॅन्ड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅपने स्टीकर फीचर बीटा व्हर्जनवर जारी केले आहे. फॉरवॉर्डेड मेसेज ट्रॅकींग आणि स्टीकर फीचरला बाय डिफॉल्ट डिसेबल ठेवले गेले आहे. याबाबत WABETaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, जर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप यूजरला आता फॉरवर्डेड मेसेज आले तर त्याची त्यांना माहिती मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅपने या दोन फीचर्स व्यतिरीक्त अ‍ॅन्ड्रॉईड आणि विंडोजसाठी बीटा व्हर्जनमध्ये ग्रुप डिस्क्रिप्शनचे सुद्धा फीचर देण्यात आले आहे. हे फीचर इनेबल करण्याची गरज नाही. हे फीचर आपोआप प्रत्येक यूजर्सना दिसणार. डिस्क्रिप्शन फीचरमध्ये ग्रुपचा कोणताही सदस्य ग्रुपचे डिस्क्रिप्शन एडिट करू शकतो. डिस्क्रिप्शनची सीमा ५०० शब्द ठरवण्यात आली आहे.

Leave a Comment