गुगलच्या डुडलमध्ये धुळवडीचा उत्साह


आज राज्यासह देशभरात अत्यंत उत्साहात आणि आनंदात होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवडीचा सण साजरा केला जातो. गुगलनेही याचेच प्रतीक म्हणून होळीचे डुडल साकारले असून गुगलच हे डुडल निळ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगातले सहकारी ढोल वाजवत आहेत एकमेकांवर रंग उधळण्यात रंगून गेले आहेत अशा आशयाचे आहे. लाल रंगात ढोल वाजवणारे लोक दाखवण्यात आले असून प्रेमाचे प्रतीक म्हणून लाल रंग ओळखला जातो. हे सहकारी प्रेमाची मुक्त उधळण करणारा सण म्हणून ढोल वाजवताना दाखवण्यात आले आहेत. तर या डुडलमध्ये गुलालाची मुक्त उधळणही दाखवण्यात आली आहे.

हिवाळा संपून वसंत ऋतूची चाहूल लागली आहे. अशात सगळ्या निसर्गात होणाऱ्या बदलांचे स्वागत म्हणून धुळवड साजरी केली जाते. धुळवडीचे सेलिब्रेशन कसे होते हे गुगलनेही डुडल तयार करून दाखवले आहे. अनेकांच्या हातात या डुडलमध्ये पिचकारी आहे. त्या सगळ्यांतर्फे रंगांची मुक्त उधळणही केली जाते आहे. आनंद आणि उत्साहाचे प्रतीक असलेली धुळवड ही गुगल या सर्च इंजिनलाही भावली आहे.

Leave a Comment