फरार आर्थिक गुन्हेगार विधेयकाला केंद्राची मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक -२०१८’ ला मंजुरी देण्यात आल्यामुळे कोट्यावधींची संपत्ती हडप करुन देशाला चुना लावणाऱ्या मोदी, माल्ल्यांसारख्या घोटाळेबहाद्दरांच्या संपत्तीवर यापुढे टाच आणणे सुलभ होणार आहे. हे विधेयक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात संसदेत मांडले जाईल.

विधेयकाच्या प्रारुपाविषयी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. विधेयकात करण्यात आलेल्या तरतूदीनुसार फरार आर्थिक गुन्हेगारांच्या संप्ततीवर टाच आणणे सुलभ ठरेल. तसेच केवळ देशांतर्गत नव्हे तर परदेशातील संपत्तीवर जप्ती आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे जेटली यांनी सांगितले.

Leave a Comment