जगातले सर्वात मोठे विमान रनवेवर धावले


जगातील सर्वात मोठे विमान स्ट्रॅटोलाँचची रनवे चाचणी यशस्वी झाली असल्याचे जाहीर केले गेले आहे. कॅलिफोर्नियात मोजेव एअर अँड स्पेस पोर्ट येथे ही चाचणी पार पडली. या विमानाचे वजन २.२६ लाख किलो असून ताशी ७५ मैल वेगाने ते धावले. यामुळे या विमानाच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१९ साली याचे पहिले उड्डाण होणार आहे.

अंतराळात रॉकेट लाँच करण्यासाठी हे विमान सक्षम आहे. २४ तासात यामुळे अंतराळ केंद्रात रसद पोहोचविणे शक्य आहेच पण यासाठी येणाऱ्या खर्चातही मोठी बचत होणार आहे. या विमानाचे पंखे ३७५ फुट लांबीची म्हणजे फुटबॉल मैदानाएवढे आहेत. याची रुंदी १२.५ फुट आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांनी या प्रोजेक्ट साठी सहकार्य केले आहे. विमानात दोन वेगळ्या केबिन असून या दोन केबिनच्या मधला भाग लाँच पॅड प्रमाणे वापरता येणार आहे. येथून रॉकेट सोडता येणार आहेत.

दोन्ही केबिनसाठी वेगळ्या कॉकपीट आहेत. उजव्या कॉकपिट मध्ये पायलट, कॉपायलट, फ्लाईट इंजिनिअर असतील तर डावी रिकामी असेल. याचा वापर आणीबाणीच्या परिस्थितीत करता येणार आहे. या विमानातून छोटे उपग्रह देखील लाँच करता येणार आहेत. हा मार्ग स्वस्त, वेगवान आहे व त्यामुळे इंधन बचत मोठ्या प्रमाणावर करणे शक्य आहे.

Leave a Comment