फेरारीची ४८८ पिस्टा सुपरकार जिनेव्हा शो मध्ये दिसणार


जिनेव्हा येथे मार्च मध्ये होत असलेल्या मोटार शो मध्ये फेरारी त्याची व्ही ८ इंजिन सिरीजमधले लेटेस्ट मॉडेल सादर करत असून ४८८ पिस्टा नावाने ही सुपरकार सादर केली जात आहे. स्पोर्टीलुक, डीएनएमध्येच रेसिंग असलेली ही कार फेरारीच्या ४८८ जीटीबीची सक्सेसर आहे. विशेष म्हणजे व्ही ८ इंजिनच्या इतिहासात फेरारीच्या या कारला दिले गेलेले सर्वात दमदार इंजिन आहे.

फेरारी ४८८ पिस्टा चा टॉप स्पीड ३४० किमी आहे.० ते १०० किमीचा वेग २.८ सेकंदात तर ० ते २०० किमीचा वेग ७.६ सेकंदात घेणाऱ्या या कारची किंमत अडीच लाख डॉलर्स म्हणजे भारतीय चालंत १ कोटी ६३ लाख रुपये आहे. ही कार भारतात येईल वा नाही हे आत्ताच सांगता येणार नाही तसेच भारतात ती आलीच तर तिची किंमत अधिक असेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment