नेदरलँड्स मध्ये जगातील पहिले प्लास्टिक फ्री सुपरमार्केट


नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅम येथे जगातले पहिले प्लास्टिक फ्री सुपरमार्केट सुरु झाले आहे. इकोप्लाझा ऑरगेनिक चेनने हे सुपरमार्केट ब्रिटीश कँपेन समूहाच्या मदतीने सुरु केले असून येथे ७०० हून अधिक वस्तू बायोमटेरीयल पॅकिंग मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मार्केटमधील लँपशेड, शेल्फ लाकूड, काच, कार्डबोर्डच्या आहेत.

या सारखी आणखी ७४ मार्केट्स येथे सुरु केली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत दर तासाला २५ लाख प्लास्टिक बाटल्या वापरल्या जातात आणि दरवर्षी ८० लाख मेट्रिक टन कचरा समुद्रात टाकला जातो. आत्ता बनत असलेल्या प्लास्टिकपैकी ९ टक्के रीसायकल होतो. प्लास्टिक उद्योगाची दरवर्षाची उलाढाल ८ लाख कोटींची आहे असे आकडेवारी सांगते.

Leave a Comment