यंदा 9.4% पगारवाढीची शक्यता! भारताने चीनला टाकले मागे


आर्थिक प्रगतीच्या बाबत भारत आणि चीनमध्ये चढाओढ असतानाच एका बाबतीत मात्र भारताने चीनवर मात केली आहे. नोकरदारांना देण्यात येणाऱ्या पगारवाढीच्या बाबतीत भारताची सरशी झाली असून यावर्षी भारतातील नोकरदारांना घसघशीत पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

अॅव्हॉन इंडिया या कंपनीने आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रातील अनेक देशांमध्ये पगारवाढीच्या शक्यतेबाबत एक सर्वेक्षण केले. या अहवालानुसार, भारतातील पगारदारांना 2018 साली सरासरी 9.4 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे, तर चीनमध्ये हा आकडा सरासरी 6.7 टक्के एवढा आहे.

वेगवेगळ्या 20 उद्योगांतील 1000 कंपन्यांमध्ये ही पाहणी करण्यात आली. भारतात गेल्या वर्षी सरासरी 9.3 टक्के एवढी पगारवाढ झाल्याचे त्यात दिसून आले. मात्र त्यापूर्वीच्या वर्षांमध्ये ही पगारवाढ दोन आकडी म्हणजे 10 टक्क्यांच्या वर होती. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पगारदारांना कमी पगारवाढ मिळणार आहे.

यात आणखी एक विशेष म्हणजे आधीच लठ्ठ पगार मिळविणाऱ्या लोकांच्या पगारामध्ये फारशी वाढ झालेली नाही. उलट वरिष्ठ व व्यवस्थापनाच्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांच्या पगारवाढीची पातळी खाली येत चालली आहे. या पगारवाढीच्या मागे कंपनीचा आकार व्यापार-व्यवसायात असे पद्धत व कामगिरी अशा अनेक घटक आहेत असे अॅव्हॉन इंडियाचे भागीदार आनंदरूप घोष यांनी सांगितले.

Leave a Comment