या देशांमध्ये काही महिन्यांमध्ये फारच कमी काळाकरिता होते रात्र


आपल्या जगामध्ये काही ठिकाणी बारा तास नैसर्गिक प्रकाश आणि बारा तास अंधार असे दिवस आणि रात्र आढळतात. तर काही देश असे ही आहेत, जिथे रात्र ही केवळ नावापुरतीच असते, आणि बाकी वेळ स्वछ ऊन पडलेले असते. या देशांमध्ये वर्षातील काही दिवस हा अनुभव घेण्याची संधी मिळते.

भौगीलिक स्थिती नुसार नॉर्वे हा देश आर्क्टिक सर्कल मध्ये येतो. या देशाला ‘ मिडनाइट कंट्री ‘ म्हणूनही ओळखले जाते. या देशामध्ये मे ते जुलै या दोन महिनांच्या काळामध्ये सुमारे ७६ दिवस सूर्यास्त जवळ जवळ होतच नाही. स्वीडन या देशामध्ये देखील रात्र फारच कमी वेळपर्यंत राहते. स्वीडन हा देश नॉर्वे या देशापेक्षा थंड असून इथे सुमारे शंभर दिवस संपूर्ण नैसर्गिक प्रकाश राहतो. आणि सूर्यास्त होतो तो मध्यरात्री आणि सकाळी साडेचारच्या सुमाराला उजाडते देखील. त्यामुळे इथे रात्र केवळ दोन ते तीन तासांपुरतीच राहते.

आईसलंड हा देश ग्रेट ब्रिटनच्या पाठोपाठ युरोपमधील दुसरे मोठे द्वीप आहे. जगामध्ये इतरत्र अंधारलेले असताना, या देशामध्ये मात्र तुम्ही रात्रीच्या वेळी देखील नैसर्गिक प्रकाशाचा आनंद घेऊ शकता. या देशामध्ये मे महिना ते जुलै महिन्यापर्यंत अंधार पडत नाही. कॅनडा हा देशातील दुसरा असा देश आहे, जो वर्षातील काही महिने बर्फाने झाकलेला असतो. या देशामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुमारे पन्नास दिवस अंधार पडत नाही.

अनेक सुंदर तलाव आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेली अनेक द्वीपे असणारा देश म्हणजे फिनलंड. ह्या देशामधील भटकंती, पर्यटकांसाठी अतिशय अप्रतिम अनुभव आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या देशामध्ये सुमारे ७३ दिवस सूर्यप्रकाश अनुभवता येतो. अलास्का मध्ये मे महिना ते जुलैच्या दरम्यान सूर्यास्त होत नाही. अलास्का तिथे असलेल्या अनेक सुंदर हिमनद्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे वर्षातील दोन महिने या बर्फाच्छादित हिमनद्या सूर्याच्या प्रकाशामध्ये चमकताना दिसतात.

Leave a Comment