लहान मुलांच्या अंगाच्या मसाजसाठी मोहोरीचे तेल उत्तम


लहान मुलांच्या, विशेषतः नवजात बालकांच्या अंगाच्या मालिशसाठी मोहोरीच्या तेलाचा वपर करण्याची पद्धत फार जुन्या काळापासून चालत आली आहे. हाडे बळकट होण्यासाठी आणि त्वचेचे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन टाळण्यासाठी मोहोरीच्या तेलाचा प्रामुख्याने वापर केला जातो. अंगाची मालिश हा नवजात बालकांच्या दिनक्रमाचा अविभाज्य अभाग असतो. मालिश केल्याने बालकाच्या शरीराला आराम मिळतो, त्याला शांत झोप लागते आणि शरीराची वाढ ही चांगली होते. मालिश करण्यासाठी अनेक प्रकारची तेले वापरली जातात. यासाठी वापरल्या जाणाऱ्या नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, मोहोरीचे तेल, या सर्व तेलाचे निरनिराळे फायदे असतात.

मोहोरीच्या तेलाने मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. मोहोरीचे तेल शरीरासाठी एका प्रकारे ‘इंस्यूलेटर’ म्हणून काम करीत असते. या तेलाने मालिश केल्याने शरीरातील उर्जा, किंवा बॉडी हीट बाहेर पडत नाही. त्यामुळे खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये, किंवा थंड प्रदेशांमध्ये राहणाऱ्यांनी मालिश साठी मोहोरीचे तेल वापरणे उत्तम. मालिश करण्याआधी तेल थोडे कोमट करू घ्यावे. या तेलाच्या मालिश मुळे हाडांना बळकटी मिळते, तसेच रक्ताभिसरण सुधारल्याने शरीराची वाढही व्यवस्थित होते.

मोहोरीच्या तेलाने मालिश केल्याने श्वासानाशी नोगडीत विकार, विशेषतः दमा दूर होण्यास मदत मिळते. या साठी मालिश करताना मोहोरीच्या तेल गरम करताना त्यामध्ये थोडासा कापूर घालून मग या तेलाने मालिश केल्यास लवकर गुण येतो. तसेच लहान मुलांच्या छातीमध्ये कफ साठत असल्यास देखील याचा फायदा होतो. कफ साठत असल्यास मोहोरीचे तेल गरम करताना त्यामध्ये एक लसणाची पाकळी घालून तेल गरम करावे, व त्याने मालिश करावी. थंडीच्या दिवसांमध्ये या तेलाच्या मालिशने विशेष फायदा होतो.

मोहोरीच्या तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. त्याचबरोबर मोहोरीचे तेल अँटी फंगल देखील आहे. त्याचप्रमाणे डासांना दूर पळविण्यासाठी देखील मोहोरीचे तेल उपयुक्त आहे. या तेलाने मालिश केल्याने त्वचेवरील रंध्रे ( pores ) मोकळी होतात. मोहोरीचे तेल उष्ण असल्याने याचा वापर उन्हाळ्यामध्ये करताना काळजीपूर्वक करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment