केवळ चार दिवसांसाठी सर्व आयफोनवर मिळत आहे मोठी सवलत


चार दिवसांचा अॅपल डे सेल ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू झाला असून हा सेल २७ फेब्रुवारीपासून झाला असून तो २ मार्चपर्यंत असणार आहे. ग्राहकांना या सेलमध्ये आयफोन एक्स, आयफोन ८, आयफोन ८ प्लस, आयपॅड, मॅकबूक आणि अ‍ॅपल वॉचवर मोठी सवलत दिली जात आहे. एसबीआय कार्ड यूजर्सना या सेलमध्ये जास्त फायदा मिळणार आहे. कारण जर तुम्ही एसबीआयचे डेबिट कार्ड सेलमध्ये खरेदीसाठी वापरले तर ५ टक्के अतिरीक्त डिस्काऊंट दिला जाणार आहे. त्याचबरोबर एसबीआय यूजर्सना इएमआय पर्यायही देण्यात आला आहे.

सेलमध्ये ६४ जीबी आयफोन एक्सच्या व्हेरिएंट ८२ हजार ९९९ रूपये तर २५६ जीबी व्हेरिएंट ९७ हजार ९९९ रूपयांमध्ये दिला जात आहे. तर ६४ जीबीचा सिल्वर ग्रे आणि गोल्ड आयफोन ८ ५४ हजार रूपयात आणि २५६ जीबीचा आयफोन ८ ६९ हजार ९९९ रूपयात, ६४ जीबीचा सिल्वर ग्रे आणि गोल्ड आयफोन ८ प्लस ६४ हजार ९९९ रूपयात, ६४ जीबीचा सिल्वर आयफोन ८ प्लस ६५ हजार ९९९ रूपयात आणि २५६ जीबीचा आयफोन ८ प्लस ७९ हजार ९९९ रूपयात मिळत आहे.

३२ जीबी आयफोन ७ ब्लॅक आणि रोज गोल्ड व्हेरिएंट ४१ हजार ९९९ रूपयात, तर ३२ जीबीचे आयफोन ७ गोल्ड आणि सिल्वर व्हेरिएंट ४२ हजार ९९९ आणि ४३ हजार ९९९ रूपयात मिळत आहे. १२८ जीबीचे आयफोन ७ व्हेरिएंट ५५ हजार ९९९ रूपयात मिळत आहे. ३२ जीबी आयफोन ७ प्लसचे व्हेरिएंट ५६ हजार ९९९ रूपयात, ३२ जीबी आयफोन ७ प्लस गोल्ड व्हेरिएंट ५७ हजार ८८५ रूपयात मिळत आहे. १२८ जीबी जेट ब्लॅक आयफोन ७ प्लस व्हेरिएंट ७९ हजार रूपयात खरेदी केले जाऊ शकते.

त्याचप्रमाणे ३२ जीबी आयफोन ६ चे स्पेस ग्रे मॉडल २४ हजार ९९९ रूपयात, ३२ जीबी आयफोन ६ चे गोल्ड मॉडल २५ हजार ९९९ रूपयात, ३२ जीबीचे आयफोन ६ एस स्पेस ग्रे मॉडल ३२ हजार ९९९ रूपयात आणि आयफोन ६ एस ३२जीबीचे गोल्ड मॉडल ३३ हजार ९९९ रूपयात मिळत आहे.

Leave a Comment