जग्वारची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही आय पेस जिनेव्हा शो मध्ये


टाटांच्या मालकीखाली असलेल्या जग्वार कंपनीने इलेक्ट्रिक सेग्मेंटमध्ये प्रवेशाची तयारी केली आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार १ मार्च रोजी सुरु होत असलेल्या जिनेव्हा येथील मोटार शो मध्ये सादर केली जात असून या एसयूव्हीचे नामकरण आय पेस असे केले गेले आहे. या गाडीचे कन्सेप्ट मॉडेल २०१६ नोवेंबर मध्ये सादर झाले होते. आता या कारची २०० युनिट तयार असून ती अनेकदा टेस्ट राईड घेताना पाहिली गेली आहे.

अत्यंत आकर्षक स्वरूपातील ही एसयूव्ही अतिशय सडपातळ एलईडी हेडलँप , हनिकोंब ग्रील सह आहे. इंटेरिअर अतिशय युनिक आहे. कारला मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, २ पर्मनंट मॅग्नेटची मोटार दिली गेली आहे. ही गाडी ० ते १०० चा वेग ५ सेकंदात घेते आणि एका चार्जमध्ये ५०० किमी अंतर कापते. तिला ९० केडब्ल्यूएच ची लिथियम बॅटरी असून ती ४५ मिनिटात ८० टक्के चार्ज होते.

Leave a Comment