गतवर्षात सायबरक्राईम मुळे ३९ लाख कोटींचे नुकसान


जगभरात सायबर क्राईमचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत चालले असून गेल्या वर्षात यामुळे ३९ लाख कोटींचे नुकसान सोसावे लागल्याचे ग्लोबल सिक्युरिटी फार्म मॅकॅफी आणि सेंटर फॉर स्ट्रॅटीजिक अॅन्ड इंटरनॅशनल स्टडीजच्या अहवालात म्हटले गेले आहे.

या अहवालानुसार रशिया सायबर क्राईम मध्ये आघाडीवर असून त्याच्या हॅकर्सनि पाश्चिमात्य देशांना अधिक नुकसान पोहोचविले आहे. नॉर्थ कोरियाने हॅकिंग मधून मिळणारा पैसा, क्रीप्टोकरन्सी शासन अधिक मजबूत बनविण्यासाठी वापरला आहे. २०१७ मधल्या वन्नाक्राय रॅनसमवेअर हल्ल्यांमागे उत्तर कोरियाच होता. ब्राझील, भारत आणि व्हिएत्नम या देशांचाही सायबर क्राईम मध्ये सहभाग आहे.

चीनने सायबर क्राईम चा वापर मुख्यत्वे हेरगिरीसाठी केल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. गतवर्षात भारतात ५३ हजार सायबर हल्ले झाले असून त्यातील ४० टक्के वित्तीय क्षेत्रावर झाले आहेत. यात हॅकरनी बँका, गुंतवणूक संस्था आणि विमा कंपन्यांना टार्गेट केले आहे. १५० देशातील २ लाख संस्था रॅनसमवेअरने हॅक करून संगणक पुन्हा सुरु करण्यासाठी बिटकॉईन रुपात खंडणी मागितली गेल्याचे हा अहवाल सांगतो.

Leave a Comment