कुंभकोणम येथील पंचमुखी हनुमान मंदिर


तामिळनाडूच्या कुंभकोणम येथे असलेले पंचमुखी अंजनेयस्वामी हनुमान मंदिर हे हनुमान मंदिरापैकी प्रसिद्ध असे एक मंदिर आहे. या मंदिरचा संबंध थेट राम रावण युद्धाशी असल्याचा समज आहे. या मंदिरात हनुमानाची पाच मुखे असलेली भव्य प्रतिमा असून तो अंजनीचा पुत्र म्हणून अंजनेय नावाने ओळखला जातो. पाच मस्तके असलेल्या या मूर्तीचे प्रत्येक मस्तक वेगळ्या देवतेचे प्रतिक आहे. यात गरुड, नरसिंह, हयग्रीव, हनुमान आणि वराह या देवतांचा समावेश आहे.

या मंदिराची कथा अशी सांगतात, राम रावणाचे युद्ध सुरु असताना रावणाने त्याचा भाऊ अहिरावण याची मदत घेतली. अहिरावण तंत्रमंत्र विद्येचा तज्ञ होता तसेच देवीचा उपासक होता. त्याने रामाच्या सैन्याला गाढ निद्रेत ठेऊन राम व लक्ष्मण यांना पाताळ लोकात नेले आणि बंदी बनविले. बिभीषणाने असे काम फक्त अहिरावण करू शकतो असे सांगितल्यावर हनुमानाची मदत मागितली गेली. हनुमानाने पाताळलोकात गेल्यावर राम लक्ष्मण बंदिवासात असल्याचे पहिले. या ठिकाणी वेगवेगळ्या दिशात पाच दिवे तेवत होते. ते एकाचवेळी विझाविले तर अहिरावण मरणार होता. म्हणून हनुमानानी पाचामुखी रूप धारण करून अहिरावणाला ठार केले आणि राम लक्ष्मणाची सुटका केली.

Leave a Comment