अव्हेनिअरकडून १६ हजार एमएएच बॅटरीचा पी १६ के प्रो सादर


बार्सिलोना येथे सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस २०१८ मध्ये अव्हेनिअर मोबाईल्सने तीन नवे स्मार्टफोन सादर केले आहेत. पैकी पी १६ के प्रो या फोनला तब्बल १६ हजार एमएएचची बॅटरी दिली गेली आहे. या कंपनीकडे एनर्जायझरचा परवाना आहे. हे तिन्ही हँडसेट एनर्जायझर पॉवरमॅक्टचे आहेत. पी १६ के प्रो, पी ४९०५, हार्डकेस एच ५९०५ अश्या नावानी हे फोन सादर केले गेले आहेत. या सर्व फोनना रिअर व फ्रंट दोन्ही बाजूना ड्युअल कॅमेरा सेटअप दिले गेले आहेत.

पी १६ के प्रोसाठी दिली गेलेली १६ के एएमएच बॅटरी नॉन रिमुव्हेबल आहे. हा फोन अनेकांचे आकर्षण बनला आहे. या फोनसाठी ५.९९ इंची फुल एलसीडी डिस्प्ले, ६ जीबी रॅम, १२८ जीबी मेमोरी, फेस डिटेक्टनसह १६ एमपी व १३ एमपीचे ऑटो फोकस ड्युअल रिअर कॅमेरे, ड्युअल टोन एलईडी फ्लॅश, फ्रंटला १३ व ५ एमपीचे ड्युअल कॅमेरे, फिंगरप्रिंट सेन्सरसह आहेत. अँड्राईड ओरिओ ८.० ओ.एस दिली गेली आहे.

पी ४९०५ साठी ४.९५ इंची डिस्प्ले, ४ के एमएएचची बॅटरी, २ जीबी रॅम, १६ जीबी मेमरी तर हार्डकेस साठी ५.९ इंची फुल एचडी डिस्प्ले कॉर्निग गोरिला ग्लाससह आहे. या फोनला ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. या फोनच्या किंमती जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

Leave a Comment