२८ फेब्रुवारीच्या आत संपवा मोबाईल वॉलेटमधील पैसे, नाहीतर…


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना फटका बसू शकतो. देशभरातील मोबाईल वॉलेट बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेण्याच्या तयारीत असून आरबीआयचे आदेश मोबाईल वॉलेट कंपन्यांनी न मानल्यामुळे ही कारवाई होऊ शकते. १ मार्चपर्यंत आरबीआयचे आदेश या मोबाईल वॉलेट कंपन्यांना पूर्ण करावे लागणार आहेत. जर तसे झाले नाही तर तुमचे मोबाईल वॉलेट अकाऊंट बंद होणार आहे.

देशभरातील लायसन्स असलेल्या मोबाईल वॉलेट कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांच्या केवायसीची अट पूर्ण केली नाही. २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ग्राहकांच्या केवायसीची माहिती द्यायला रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. ही अट मोबाईल वॉलेट कंपन्यांनी पूर्ण केली नाही तर १ मार्चपासून मोबईल वॉलेट बंद होतील.

देशातील ९ टक्क्यांहून कमी मोबाईल वॉलेट कंपन्यांना आत्तापर्यंत ग्राहकांनी त्यांचे केवायसी दिले असल्यामुळे देशातील ९१ टक्के ग्राहकांनी त्यांचे केवायसी मोबाईल वॉलेट कंपन्यांना दिलेले नाहीत. अशा ९१ टक्के ग्राहकांचे मोबईल वॉलेट बंद होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांना वेळोवेळी एअरटेल मनी, पेटीएम सारख्या मोबाईल वॉलेट कंपन्या केवायसी पूर्ण करण्याची विनंती करत आहेत. या मोबाईल वॉलेटला ग्राहकांना आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक करावे लागणार आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्यावर केवायसी पूर्ण होणार आहे. केवायसी पूर्ण झाल्यावर ग्राहकांना त्यांचे मोबाईल वॉलेट वापरता येईल.

Leave a Comment