म.गांधींच्या जुन्या फोटोचा ६५ हजारात लिलाव होण्याची अपेक्षा


भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एका जुन्या फोटोचा लिलाव केला जात असून या फोटोला १० हजार डॉलर्स म्हणजे ६५ हजार रु. किंमत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या फोटोवर गांधीजींची सही आहे. तसेच मदन मोहन मालवीय आणि राष्ट्रपती या फोटोत दिसत आहेत. या फोटोवर गांधीनी एम.के. गांधी असे लिहून सही केली असून त्यासाठी फौंटनपेनाचा वापर केला आहे.

हा फोटो गांधीजी १९३१ मध्ये लंडन येथे आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित राहण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गेले होते तेव्हा घेतला गेला आहे. फोटोमागे ग्रेट ब्रिटन असोसिएटेड प्रेस कॉपी राईट शिक्का आहे. हा लिलाव ७ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. १९३० ते ३२ या काळात तीन वेळा गोलमेज परिषदेचे आयोजन केले गेले होते. असे समजते की हा फोटो काढला गेला तेव्हा गांधीजींचा हाताचा अंगठा खूप दुखत होता.

Leave a Comment