सॅमसंग गॅलॅक्सी एस ९, प्लस लाँच


बार्सिलोना येथे सुरु झालेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये कोरियन कंपनी सॅमसंगने त्याचे नवे गॅलॅक्सी एस ९ व एस ९ प्लस हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. नोकियाने त्याचे पाच नवे स्मार्टफोन सादर केल्यानंतर सॅमसंग गॅलॅक्सी फोन सादर केले गेले आहेत. या फोनसंदर्भात कंपनीने अनेक दावे केले आहेत. एस ९ ची किंमत ७२० डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात ४६७०० रुपये असून प्रत्यक्ष भारतात हि किंमत यापेक्षाही अधिक असेल असे समजते.

एस ९ साठी ५.८ इंची क्वाड एचडी डिस्प्ले कर्व्हड सुपर एमोलेड स्क्रीन सह दिला गेला आहे. अँड्राईड ८.० ओरिओ ओएस, स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, ४ जीबी रॅम, ६४, १२८, २५६ जीबी स्टोरेज, मायक्रो कार्डच्या सहाय्यने ते ४०० जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा यात दिली गेली आहे. १२ एमपीचा सुपर स्पीड डूअल कॅमेरा, ऑटोफोकस सेन्सर दिले गेले असून स्लो मोशन फिचर दिले गेले आहे.

फोनसाठी ३ हजार एमएएचची बॅटरी क्विक चार्ज वायरलेस चार्जिंग सुविधेसह आहे. यात एआर एमोजी फिचर असून यामुळे युजर पर्सनल ईमोजी तयार करून ती शेअर करू शकतो. हा फोन मिडनाईट ब्लॅक, कोरल ब्लू, टायटेनियम ग्रे आणि लाइकल पर्पल अश्या चार रंगात आहे. रिअरला फिंगरप्रिंट सेन्सर असून इंटेलीजन्ट स्कॅन फिचर दिले गेले आहे. यामुळे फेस तसेच आय रेक्ग्नीझेशन होते.

Leave a Comment