व्होडाफोन दररोज देणार ४.५ जीबी डेटा


नवी दिल्ली : रिलायन्स जिओमुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या कॉल दरात घट करत नव-नवे प्लान्स सादर करीत आहेत. व्होडाफोनने आता आपल्या ग्राहकांना एकत्र ठेवण्यासाठी आणि नवे ग्राहक जोडण्यासाठी दोन नवे प्लान्स लॉन्च करण्याची तयारी केली असून व्होडाफोनने हे दोन नवे धमाकेदार प्लान्स लॉन्चिंगची तयारी जिओच्या डेटा प्लान्सला टक्कर देण्यासाठी सुरु केलीय. ग्राहकांना या प्लान्समध्ये दररोज ४.५ जीबी इंटरनेट डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

७९९ रुपये आणि ५४९ रुपयांचे प्रीपेड प्लान्स व्होडाफोनने लॉन्च केले असून ७९९ रुपयांच्या प्लान्समध्ये युजर्सला दररोज ४.५ जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. तर, ५४९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३.५जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. व्होडाफोनने हे प्लान्स काही ठराविक सर्कलमध्ये लॉन्च केले आहेत.

Leave a Comment