सरकारच्या हाय रिस्क यादीत तब्बल ९५०० फायनान्स कंपन्या


नवी दिल्ली – सुमारे ९५०० नॉनबँकिंग फायनान्शियल कंपन्यांची (एनबीएफसी) एक यादी अर्थ मंत्रालयातंर्गत काम करणाऱ्या वित्तीय गुप्तवार्ता शाखेकडून (एफआययू) जारी करण्यात आली असून अति जोखमीच्या वित्त संस्था त्या असल्याचे सांगण्यात आले आहे. एफआययू-इंडियाच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या या एनबीएफसीजच्या (बिगर बँकिंग वित्तीय संस्था)नावांचा समावेश असून त्यांना हाय रिस्क प्रकारात ठेवण्यात आले आहे.

३१ जानेवारीपर्यंत मनी लाँड्रिंग अॅक्टच्या नियमांचे या कंपन्यांनी पालन केले नव्हते. ५०० आणि १ हजार रूपयांची नोट ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री अवैध घोषित केल्यानंतर प्राप्तिकर विभाग आणि सक्त वसुली संचालनालयाच्या (इडी) रडारवर नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या आल्या होत्या. अनेक लोकांच्या जुन्या नोटा बदलून देऊन काळ्या पैशाच्या निर्मितीस या कंपन्यांनी मदत केली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

Leave a Comment