कलोन्जी (कांद्याचे बी) चे आरोग्यासाठी फायदे


कलोन्जी, म्हणजेच कांद्याच्या बियांचा वापर फार पुरातन काळापासून आपल्याकडे केला जात आहे. या बियांमध्ये अनेक औषधी गुण असल्याने आयुर्वेदामध्ये देखील या बियांना महत्वाचे स्थान दिले गेले आहे. अनेक ठिकाणी कलोन्जीला काळे जिरे म्हटले जाते. कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशीयम, आणि फायबर हे तत्वे मुबलक मात्रेमध्ये असलेली कलोन्जी अनेक औषधांमध्ये वापरली जाते. कलोन्जीच्या सेवनाने अनेक आजार दूर होण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रुग्णांकरिता कलोन्जीचे सेवन अतिशय फायदेशीर ठरते, त्यामुळे या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये याचा समावेश अवश्य करावा. ज्यांना सांधेदुखीचा त्रास होत असेल, त्यांनी कलोन्जीच्या तेलामध्ये लसणीच्या पाकळ्या घालून त्याचा चांगला काढ काढावा, आणि थंड झाल्यावर या तेलाने सांध्यांची मालिश करावी. तसेच मालिश केल्यानंतर त्या ठिकाणी कापडाची पट्टी बांधून ठेवावी. काही दिवस दररोज हा उपाय केल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

कर्करोगाशी लढण्याची क्षमता असणारे अँटी ऑक्सिडंट्स कलोन्जीमध्ये मुबलक मात्रेमध्ये असतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कलोन्जीचे सेवन केले जाणे गरजेचे आहे. ह्यासाठी एक चमचा कलोन्जीचे तेल एक ग्लास द्राक्षाच्या रसामधून घेतल्याने शरीराला पोषण मिळते. ज्यांना किडनी स्टोन असेल, त्यांनी त्यांनी कलोन्जीच्या बिया वाटून मधासोबत घ्याव्या. त्याने स्टोन निघून जाण्यास मदत होईल.

कधी कधी रात्रीची झोप अपुरी झाल्याने किंवा थकवा आल्याने, मानसिक तणाव आल्याने डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. डोकेदुखीपासून आराम मिळविण्याकरिता कलोन्जीच्या तेलाने मालिश करावी. या तेलाने मालिश केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment