सध्या लोक नात्यांपेक्षा मोबाइलला जास्त महत्व देऊ लागले आहेत


मुंबई – सद्यस्थितीत ज्येष्ठ असो वा तरुण प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आला असून आपण एकवेळ आपले पाकिट घरी विसरल्यावर जितके टेंशन येणार नाही त्यापेक्षा जास्त टेंशन मोबाइल किंवा स्मार्टफोन विसरल्यावर येते. प्रत्येकाच्या आयुष्याचा मोबाइल हा अविभाज्य घटक ठरला असून सध्याच्या घडीला मोबाइल हे एक व्यसन झाले आहे. आपण कितीही प्रयत्न केला तरी हे व्यसन सुटतासुटत नाही.

नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, आपल्याभोवती तंत्रज्ञानाचा फास एवढा आवळला गेला आहे की नात्यांपेक्षा मोबाइलला जास्त महत्व लोक देऊ लागले आहेत. आजकाल आपल्या मित्र आणि नातेवाईकांपेक्षा लोक स्मार्टफोनवर जास्त प्रेम करतात असे या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे.

ज्यामध्ये जवळपास ३३ टक्के तरुणांची संख्या जास्त असून ज्यांचा जन्म डिजीटल युगात झाला आहे. आपल्या स्मार्टफोनला हे लोक जवळपास असणा-या लोकांपेक्षा जास्त महत्व देतात. हे प्रमाण भारतात सर्वात जास्त असून याबाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

याबाबतचे सर्वेक्षण मोटोरोलाने केले असून त्यामध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे. हॉवर्ड विद्यापीठासोबत मिळून मोटोरोलाने हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५० टक्के लोकांनी स्मार्टफोन आपला जवळचा मित्र असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment