स्टीव जॉब्जच्या जुन्या नोकरी अर्जाला लिलावात ३२ कोटींची बोली


अॅपल या अतिश्रीमंत कंपनीचा संस्थापक स्टीव जॉब्ज याने कधीकाळी एका कंपनीत नोकरी मिळण्यासाठी केलेला अर्ज लिलावात विक्रीसाठी आला आहे. विशेष म्हणजे या अर्जाच्या खरेदीसाठी अनेकजन उत्सुक असून हा अर्ज बोस्टन ऑक्शन हाउसतर्फे लिलावात काढला जाणार आहे. या अर्जाला ५० हजार डॉलर्स म्हणजे ३२ लाख रुपयांपर्यंत बोली लागेल असे पी आर ऑक्शन तर्फे सांगण्यात आले आहे.


स्टीव्ह सुरवातीला अनेक ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून प्रयत्नात होता. १९७३ साली त्याने कुठल्यातरी कंपनीत नोकरीसाठी हा अर्ज केला होता. या अर्जात व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. स्पेलिंग, पूर्णविराम, स्वल्पविराम याच्याही चुका आहेत. या अर्जात त्याने आपले नाव स्टीवन ओजस असे लिहिले आहे. या अर्जातील माहितीवरून त्याच्याकडे त्यावेळी लँड लाईन फोन नव्हता असेही दिसून येत आहे. माहितीत त्याने त्याच्याकडे वाहनचालक परवाना असल्याचे, पदवी इंग्रजी साहित्य विषयात असल्यचे व इंजिनिअरींग डिझाईन अथवा टेक्निकल विभागात काम करण्याची इच्छा असल्याचे नमूद केले आहे.

या अर्जानंतर काही वर्षातच त्याने मित्रासोबत अॅपल ची स्थापना केली आणि आज हि कंपनी जगातील नंबर वन कंपनी बनली आहे.

Leave a Comment