सौदी अरामको भारतात गुंतवणूक करणार


जगातील सर्वात मोठी पेट्रो कंपनी सौदी अरामको भारतात गुंतवणूक करणार आहे. भारतातील सध्या कार्यरत असलेले तेल शुद्धीकरण प्रकल्प तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १.८ लाख कोटी खर्च करून बनलेल्या तेलशुद्धी प्रकल्पात मोठी गुंतवणूक सौदी करणार असल्याचे सौदीचे पेट्रोलियम मंत्री खालिद अल फालोह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले सध्याच्या तेलशुद्धी प्रकल्पाबरोबरच भविष्यातील प्रकल्पातही आम्ही भारताबरोबर भागीदारीसाठी उत्सुक आहोत. त्यासाठीची बोलणी सुरु आहेत. पश्चिम किनारपट्टीवर मोठा तेलशुद्धी प्रकल्प होणार आहे त्यातही आम्ही भागीदारीसाठी प्रयत्नशील आहोत. सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पाच्या विकासासाठी आम्ही गुंतवणूक करू इच्छितो. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनीही सौदी सरकारबरोबर गुंतवणुकीसाठी चर्चा सुरु असल्याचे सांगितले. ते म्हणणे इराकनंतर भारताला कच्चे तेल पुरविणारा सौदी हा दुसरा मोठा देश आहे. भारताची २० टक्के गरज हा देश पूर्ण करतो. त्यामुळे ते केवळ तेल पुरवठा नाही तर भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत.

Leave a Comment