म्हशी आणि रेड्यांचा रँपवॉक


हरीयानातील सघवा या गावी नुकतीच वार्षिक मुराह जातीच्या म्हशी आणि रेडे याच्या चँपियनशिप पार पडल्या. हे मुराह जातीच्या किंवा वाणाच्या म्हशिंसाठी जगभरात प्रसिद्धीस आले असून या गावामुळे हजारो शेतकरी लाखोनी कमाई करत आहेत.

येथे पार पडलेल्या चँपियनशिप स्पर्धेचे आयोजक ईश्वरसिंग म्हणाले दोन दिवस या स्पर्धा झाल्या त्यात पहिल्या दिवशी १ ते सहा महिने वयाच्या वासरांसाठी ब्युटी कॉन्टेस्ट फ्हेण्यात आली. तसेच देशभरातील या वाणाच्या म्हशी आणि रेडे याचा कॅटवॉक घेण्यात आला. त्यात धन्नो, हेमामालिनी, पार्वती, राणी, मिनू, गिनती, यमुना या म्हशीनी प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तसेच ७ कोटींपेक्षा अधिक किंमत असलेला रेडा युवराज, अर्जुन, रुस्तम, सुलतान यांनीही कॅटवॉक मध्ये सहभाग घेतला. या रेड्याचे मालक त्याचे वीर्य विकून वर्षाला लाखो रुपयांची कमाई करत आहेत तसेच म्हैस मालक दुध विकून वर्षाला खूपच भक्कम उत्पन मिळवीत आहेत.

Leave a Comment