‘स्मोकी आय मेकअप‘ अशी घ्या काळजी


पार्टी असो, किंवा डेट, लग्नप्रसंग असो, किंवा इतर कुठला समारंभ, आजकाल प्रसाधन करताना महिला ‘ स्मोकी आय मेकअप ‘ला पसंती देऊ लागल्या आहेत. जेव्हा ही ट्रेंड अस्तित्वामध्ये आली, तेव्हा या प्रकारच्या मेकअप साठी केवळ काळ्या रंगाच्या वापर केला जात असे. पण आता सध्याची ट्रेंड लक्षात घेता, हा ‘स्मोकी’ लूक जास्त खुलून दिसण्यासाठी निरनिरळे रंग, आणि अनेकदा रंगांचे कॉम्बिनेशन करून देखील हा लुक दिला जात आहे. हा लुक अगदी चोखपणे साधण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

आय मेकअप सुरु करण्याआधी डोळे आणि त्यांच्या आसपासची त्वचा व्यवस्थित साफ करून घ्यावी. त्यानंतरच मेकअप सुरु करावा. जर स्मोकी आय मेकअप सुरु करण्यापूर्वी डोळ्यांवर कोणत्याही प्रकारचे प्रसाधन आधीपासून लावलेले असेल, तर ते हटवून मगच आय मेकअप सुरु करावा. स्मोकी लुक परफेक्ट साध्य होण्यासाठी बेस, म्हणजे ज्या भागावर मेकअप करायचा तो भाग स्वछ करणे अतिशय आवश्यक आहे. डोळ्यांच्या कडा हाय लाईट करण्यासाठी पेन्सिल लायनर्सचा उपयोग करावा. सौम्य आणि क्रीमी टेक्स्चरसाठी पेन्सिल लायनर्स हा उत्तम पर्याय आहे.

जर तुमच्या आयलीड्स वर, म्हणजेच पापण्यांवर सुरकुत्या असतील, तर ब्राऊन किंवा अन्य हलक्या रंगांच्या शेड्स वापरून स्मोकी लुक साध्य करता येईल. हलक्या रंगांचा स्मोकी लुक देखील सुंदर दिसतो. स्मोकी लुक उत्तम प्रकारे साध्य करण्यासाठी एकाच शेडचा वापर न करता, दोन किंवा तीन शेड्स चा एकत्रित वापर करावा. जर तीन शेड्स चा वापर करायचा असेल, तर एक शेड गडद असावी, दुसरी एकदम हलकी असावी आणि तिसरी शेड या दोन्ही शेड्सच्या मधली छटा असावी. या तीन शेड्स च्या मिश्रणाने डोळ्यांचा अतिशय सुंदर इफेक्ट तयार करता येतो.

स्मोकी आय मेकअप साठी जी प्रसाधने वापराल, ती शक्यतो ‘ स्मज प्रूफ ‘ असावीत, म्हणजेच अचानक डोळ्यांना हात लागला किंवा पाणी लागले तरी न फिसकटणारी असावीत. अश्या प्रकारची स्मज प्रूफ प्रसाधने वापरल्याने आय मेकअप खूप वेळपर्यंत चांगला राहील आणि त्याला वारंवार टच-अप ची गरज पडणार नाही. स्मोकी आय मेकअप करताना डोळ्यांच्या आतील कोपऱ्यांमध्ये व्हाईट किंवा तुम्ही वापरत असलेल्या शेड्सपेक्षा निराळी शेड वापरून स्मोकी आय मेकअप अजूनच सुंदर बनविता येईल. ह्या आय मेकअप साठी जर दोन किंवा तीन शेड्स वापरणार असाल, तर त्या शेड्स व्यवस्थित ‘ ब्लेंड ‘ होतील, म्हणजेच एकमेकांमध्ये मिसळतील याची काळजी घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment